Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

 भौगोलिक संकेत प्राप्त  आंबेमोहर तांदूळ,पुरंदर अंजीर  आणि “एक जिल्हा ,एक उत्पादन” विषयावरील पुणे जिल्ह्याच्या “टोमॅटो “ या विशेष आवरणाचे विमोचन

 ‘आझादी का अमृतमहोत्सव’ वर्षातील ‘फिलेटेली’’ दिनानिमित्त, भौगोलिक संकेत प्राप्त आंबेमोहर तांदूळ,पुरंदर अंजीर आणि “एक जिल्हा ,एक उत्पादन” विषयावरील पुणे जिल्ह्याच्या “टोमॅटो “ या विशेष टपाल आवरणाचे विमोचन  11  ऑक्टोबर 2022 रोजी श्री रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र  यांचे हस्ते झाले यावेळी श्रीमती. सिमरन कौर, संचालक डाक सेवा, पुणे क्षेत्र, डॉ. अंजली दत्ता , अध्यक्ष डेक्कन फिलाटेलिक सोसयटी ,कर्नल. आर. के. चव्हाण, खजिनदार ,आर्मी  फिलाटेलिक सोसयटी ,श्री.अप्पासाहेब काळभोर ,अध्यक्ष अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ , श्री. हरिष मेंगडे, अध्यक्ष मुळशी तालुका आंबेमोहर संवर्धन संघ,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. रामचंद्र जायभाये,पोस्ट मास्टर जनरल पुणे क्षेत्र यांनी भौगोलिक संकेत प्राप्त आंबेमोहर तांदूळ,पुरंदर अंजीर चे महत्व आणि खाद्य प्रसंस्ककरण उद्योग मंत्रालय द्वारा “आत्मनिर्भर भारत” अन्वये पीएमएफएमई योजनेला प्रोत्साहन मिळण्यासाठी “एक जिल्हा ,एक उत्पादन” विषयावरील पुणे जिल्ह्याच्या “टोमॅटो “  या विशेष आवरणाबद्दल माहिती दिली.

यावेळी बोलताना श्रीमती. सिमरन कौर, निदेशिका पोस्टल सर्व्हिस, पुणे रिजन, यांनी या प्रसंगी प्रसिद्ध झालेल्या विशेष कव्हरच्या प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात  अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, मुळशी तालुका आंबेमोहर संवर्धन संघ चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

      आंबेमोहर तांदूळ, पुरंदर अंजीर आणि टोमॅटो  हे विशेष आवरण पुणे हेड पोस्ट ऑफिस, पुणे सिटी पोस्ट ऑफिस आणि पुणे टपाल क्षेत्रातील अहमदनगर, बारामती, कराड, पंढरपूर, सातारा, सोलापूर आणि श्रीरामपूर येथील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Spread the love