Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुण्यातील योग दिन कार्यक्रमात परदेशी प्रतिनिधी सहभागी

जीवनातील तणाव दूर करण्यासाठी योग साधना हा उत्तम पर्याय -केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुण्यातील जी 20 परिषदेच्या शिक्षण विषयक कृती गटाच्या बैठकीत सहभागी परदेशी प्रतिनिधींनी आजच्या आंतर राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात योग साधना केली .दैनंदिन जीवनातील ताण तणाव दूर करण्यासाठी योग साधना हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना सांगितले . 

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती,  , केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजयकुमार, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता सचिव अतुल तिवारी,  पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव , महापालिका आयुक्त विक्रमकुमार, विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी,  अधिसभा सदस्य राजेश पांडे आणि अन्य मान्यवर देखील या योग साधनेत सहभागी झाले होते . महर्षी विनोद रिसर्च फाऊंडेशन चे डॉ . संप्रसाद विनोद आणि योगगुरू डॉ . विश्वनाथ भिसे यांनी यावेळी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली  आणि अभिजात योग साधनेबद्दल मार्गदर्शन केले .  

आजच्या योग साधनेमध्ये प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन आणि शवासन आदी विविध प्रकारची आसने करण्यात आली . परदेशी प्रतिनिधींचा त्यातील सहभाग वाखाणण्याजोगा होता . 

आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात निर्माण होणारा तणाव दूर होण्यास योग साधनेमुळे मदत होते असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला .परदेशी पाहुण्यानी देखील हा अनुभव घेतला असल्याचे ते म्हणाले . 

आजच्या योगाभ्यासा मुळे वेगळ्याच प्रकारचे आत्मिक आणि मानसिक समाधान मिळाल्याची भावना अनेक परदेशी प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा . सुरेश गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले .

Spread the love