Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सिद्धांत आर्टस् पुणे यांच्या वतीने पहिला खाद्य सफर पुरस्कार सोहळा संपन्न

पुणे : पुणे व पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय त अनेक वर्ष सातत्यानं लोकांना स्वादिष्ट व रुचकर जेवण देऊन सेवा देणाऱ्या व्यवसायकांचा सन्मान सिद्धांत आर्टस् पुणे खाद्य सफर च्या वतीने संपन्न झाला

सिद्धांत आर्टस् पुणे यांचा पहिला खाद्य सफर जीवन गौरव पुरस्कार हॉटेल गिरीजा,चे मालक मा. श्री चंद्रकांत तुकाराम सणस यांना सिद्धांत आर्टस् चे संस्थापक मा. श्री राहुल हरिभक्त व खाद्य सफर टीम च्या वतीने प्रधान करण्यात आला.

सणस यांनी 50 वर्ष आज पुण्याच्या मध्यवर्ती भागात गिरीजा नावानं हॉटेल चालवून पुणेकरांना चवीस्ट व घरगुती प्रकारचे जेवण देऊन पुणेकरांची सेवा करत आहे त्यांना यावर्षी चा सिद्धांत आर्टस खाद्य सफर चा पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला.

या कार्यक्रमास
सिद्धांत आर्टस् पुणेचे संस्थापक श्री राहुल हरिभक्त,प्रमुख पाहुणे श्री अशोक ढगे,व्यवस्थापकीय संचालक फनी बाईट चॉकलेट्स व सॊ शुभदा राहुल हरिभक्त आणि खाद्यसफर ची पूर्ण टीम उपस्थित होती.

यावेळी पुणे व पुणे जिल्ह्यातील हॉटेल मैत्रीचे पोहे मालक – विशाल विटकर आणि प्रशांत डोंगरे, हॉटेल
S4G – मालक – संदीप कुंजीर, संदेश भोंडवे, शिवाजी जवळे आणि गजानन सानप, हॉटेल माॅ॑जिफेरा – मालक शृत्विद आठल्ये आणि अनंत मुद्वाडकर,गणेशभेळ पाणीपुरी – मालक गणेश म्हस्के आणि परिवार कृषी पर्यटन विभागात बाजिंद – प्रणव मंडलिक, स्पेशल मासे विभागात फिश ऑन डिश – मालक ओंकार बुरंगुळे आणि प्रज्ञा भोकरे, हॉटेल मराठ मावळा – मालक संग्राम जगताप, विशेष मांडणी वर चावीस्ट हॉटेल वाडा by गावरान तडका -मालक रोहित जमाले आणि सारिका शेजल तर पहिला या वर्षी चा जीवन गौरव खाद्यसफर पुरस्कार
हॉटेल गिरिजा – मा. श्री. चंद्रकांत तुकाराम सणस.
यांना प्रदान करण्यात आला.पुणेरी टोपी,शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला डिजिटल विभागात Vlog with पूनम व The Foodie यात्रा यांचा ही सन्मान केला.

हॉटेल गिरीजा चे चंद्रकांत सणस त्यानी पुणेकरांना आवडणाऱ्या डिसेस वआवडीनिवडी बाबतीत कसे बद्दल करायचे याबाबत सांगितले आज राजकारण लोकांपासून ते पत्रकार पर्यंत सर्व गिरीजा हॉटेल ला आवर्जून भेट देतात व पुण्यात किमान रात्री 2वाजेपर्यंत अविरत सेवा करतात असे त्यांनी सांगितले

खाद्यसफर पुरस्कार सोहळा चे आयोजन सिद्धांत आर्टस् पुणे ची टीम संकेत हरिभक्त, आर्यन हरिभक्त, अथर्व कन्नलू,प्रथम सिंगवलं, गायत्री बुधवंत, सोनाल सुरतकर व नेहा माळी यांनी केले होते
कार्यक्रम चे आभार प्रदर्शन श्री संकेत हरिभक्त यांनी केले तर सूत्रसंचालन आर्यन व गायत्री नी केले

Spread the love