Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

फिक्की महिला आघाडीने शहरातील मजुरांना व कामगारांना दिली तंबाखू जन्य पदार्थ न खाण्याची शपथ

”व्यसन सोडा जीवनाशी’ नाते जोडा फिक्की महिला आघाडीच्या वतीने जनजागृती

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त पुणेकर महिलांनी केले प्रबोधन

पुणे : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या शरिराची व कुटूंबाची मोठी हाणी होते. हृद‍्यविकार, कर्करोग अशा या आजारामुळे नाहक प्राण गमवावे लागते.  प्रत्येकाने चांगले सृदृढ आयुष्य जगण्यासाठी ‘व्यसन सोडा जीवनाशी’ नाते जोडा असा, संदेश फिक्की महिला आघाडीच्या वतीने केशव नगर येथील मिलिनीम लेबर कॅम्प येथील कामगारांना देण्यात आला. यावेळी कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ यावेळी त्यांनी घेतली.

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त फिक्की महिला आघाडीच्या वतीने केशव नगर येथील मिलिनीम लेबर कॅम्प येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी  फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम शेवलेकर, उपाध्यक्षा पिंकी राजपाल, सहखजिनदार पुनम कोचर, तानिया गेहाणी, निता खंडेलवाल, मरिअम दारुवाला, गायत्री घुले, रेखा शहा, मोना चोप्रा, गौरी ढोलेपाटील, ऊर्वशी शहा, मिनाक्षी मल्होत्रा यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी ‘तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर रहा, आपले जीवन सुरक्षित ठेवा’ या विषयावर महिला पदाधिकार्‍यांनी संदेशपर नाटकाचे सादरीकरण केले. कष्टाच्या कामासाठी व्यसनाचा आधार घेऊ नका, आपल्या पाल्यांना चांगले शिक्षित करुन भविष्य उज्वल करा.

त्यांच्या शिक्षणावर पैसा खर्च करा, असा संदेश यावेळी नाटकातून महिला पदाधिकार्‍यांनी दिला.
निलम सेवलेकर म्हणाल्या, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य बिघडत आहे.

त्यामुळे कर्करोगासारखे भयंकर रोग माणसाला जडतात. व्यसनाला दूर ठेवण्यासाठी आघाडीच्या वतीने जनजागृती करण्यात आली. आमच्या संस्थेच्या वतीने प्रबोधन सुरुच राहणार आहे. तंबाखूचा राक्षस आपल्या आयुष्यात येऊ देऊ नका, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी नाटिका सादर करुन ‘व्यसन सोडा जिवनाशी नाते जोडा’ असा संदेश यावेळी त्यांनी दिला. गुटखा, विडी, तंबाखूच्या रुपातील राक्षस आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतो.

त्यामुळे आपल्या सुंदर जीवनाशी नाते जोडा, असेही यावेळी सांगण्यात आले. व्यसनाला करा बाय बाय, द्या आरोग्याला न्याय, करा आरोग्याचा विचार, द्या व्यसनाला नकार असा संदेशही यावेळी देण्यात आला.

Spread the love