‘संस्कृती आणि जागतिकीकरण’ या विषयावर त्यांनी व्यक्त केले आपले विचार

पुणे, २८ सप्टेंबर २०२२: एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने आज भारतातील सर्वात ख्यातनाम लेखक आणि पौराणिक कथाकार देवदत्त पटनायक यांच्या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. पटनायक यांच्यासोबतच्या या भेटीने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. यावेळी ते “संस्कृती आणि जागतिकीकरण” या विषयावर बोलले.

या कार्यक्रमात पटनायक यांनी आधुनिक जगातील पौराणिक कथांच्या प्रासंगिकतेवर उत्कट विचार व्यक्त केले.त्यांनी खाद्यपदार्थ, पारंपारिक विधी , पौराणिक कथा- कल्पनांद्वारे त्यांनी संस्कृतीच्या सारावर सुंदरतेने प्रकाश टाकला. ते म्हणतात की पुराण कथा म्हणजे इतर लोकांच्या सत्यांबद्दल शिकणे आणि जेंव्हा मी इतर लोकांच्या सत्यांबद्दल शिकतो मी जागतिकीकरण कडे जातो. या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन एक खुप उत्साही होता, ज्याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना जगभरातील इतिहास आणि पौराणिक कथांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

संस्कृतीच्या अभ्यासपूर्ण दृष्टीकोनावर भर टाकल्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तरे सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी त्यांना तीक्ष्ण, चटकदार आणि नम्रपणे उत्तरे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक दुष्टीकोणातुन जगाकडे कसे पहायचे हे सांगितले.

त्यांच्या व्याख्यातुन त्यांनी संस्कृती आणि सभ्यता यांच्यातील योग्य फरक दर्शवला. ते म्हणाले, संस्कृती म्हणजे मानव निसर्गात कसा जगतो हे होय, सभ्यता म्हणजे जेव्हा लोक एकमेकांशी कथा, कल्पना, अन्न, सेवा यासारख्या गोष्टींची देवाणघेवाण करतात. शेवटी ते म्हणाले, “मला आशा आहे की तुम्ही संस्कृती आणि जागतिकीकरणाचा हा प्रवास सुसंस्कृत कराल.”

याप्रसंगी, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य डॉ. अमृता वोहरा म्हणाल्या, पटनायक हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आमचे स्वताचे तसेच इतरांच्या संस्कृतीबद्दल अधिक उत्सुकतेने समजुन घेण्याची प्रेरणा मिळाली. आमच्या शाळेत वाचनाच्या सवयीला आम्ही खुप महत्व देतो. पटनायक यांच्या सोबतच्या आजच्या सत्राद्वारे, विद्यार्थ्यांना पौराणिक कथांचे जग कळाले. आणि ते देखील त्यांच्या कल्पनेला उधाण देणार्या त्यांची विश्वदृष्टी वाढवणाऱ्या शैली द्वारे.


एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला . कॉलिन्स लर्निंग इंडिया आणि हार्पर कॉलिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेने हे सत्र आयोजित केले होते
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !