Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात ‘स्कूल ऑफ लिबरल आर्टस’ शैक्षणिक प्रणाली -कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा

पुणेः- भारत सरकार तर्फे नवीन शैक्षणिक धोरण-२०२० जाहीर करण्यात आले आहे. या धोरणा अंतर्गत विदयापीठांच्या रचनेमध्ये अमूलाग्र बदल सुचविले असन एक-शाखीय विदयापीठे ही पूनरचित बहु शाखीय विद्यापीठे म्हणून उदयास यावी यासाठी रूपरेषा स्पष्ट करण्यात आलेली आहे. सदरचे शैक्षणिक धोरण राबविण्यास विविध पातळीवर प्रयत्न सरु झालेले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लिबरल आर्टस’ ही नवीन शैक्षणिक प्रणाली स्थापना करत आहे. त्यामुळे विदयापीठातील आरोग्य विज्ञान शाखेतील आणि इतर सर्व शाखातील विदयार्थ्यांना या नवीन प्रणाली मार्फत राबवविले जाणारे अभ्यासक्रम सुदधा स्वीकारता येणार आहेत.

पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात लवकरच ‘स्कूल ऑफ लिबरल आर्टस’ तर्फे नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन, भरतनाट्यम् आणि नृत्ययोगा, कथक नृत्य हे परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रकार या विभागाअंतर्गत असतील. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘स्कूल ऑफ लिबरल आर्ट’ विभागाला नुकतीच मान्यता मिळाली असून नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन (डान्स व कोरिओग्राफी) आणि नृत्ययोगा हे दोन्ही विषय शिकविणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच अभिमत विद्यापीठ असेल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

“नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती असून भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती आणि परंपरा हा नवीन शिक्षणक्रमाचा आणि पुनर्रचनेचा पाया असेल. या पार्श्वभूमीवर ही नवी विद्याशाखा प्राचीन भारतीय कला शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल”, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड, तसेच राज्ययभरातील ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना या नव्या विभागात प्रवेश घेता येईल. या विभागासाठी , उच्च पायाभूत सुविधा विद्यापीठात पुरविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.नवीन शैक्षणिक धोरणात अभिमत तसेच खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविदयालये आणि खासगी संस्थांचे योगदान खूप महत्त्वाचे असणार आहे.

छायाचित्रकला, चित्रकला, गायन, वादन, याप्रमाणेच नृत्य हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो. या क्षेत्रामध्ये नाव कमावताच व्यावसायिक सफलता मिळविता येते. त्यामुळेच या कलांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन करिअरच्या विविध संधी उपलब्ध करण्याचा उद्देश आहे, असे डॉ. पाटील म्हणाले.

विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी वयाच्या पन्नाशीनंतर सात वर्षे जग प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना हेमा मालिनी यांच्यापासून प्रेरणा घेत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक दीपक मुजुमदार यांच्याकडे सात वर्षे भरतनाट्याचे शिक्षण घेतले.

त्यानंतर अरंगेत्रम कार्यक्रम नुकताच सादर केला होता. त्याच वेळी डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात नृत्यकला अभ्यासक्रम सुरू करण्याचे सुतोवाच त्यांनाी केले होते. नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन, भरतनाट्यम आणि नृत्ययोगा शिकविण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी ‘स्कूल ऑफ लिबरल आर्ट’च्या अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी स्थापन केलेल्या समितीच्या चेअरमनपदाची जबाबदारी डॉ. नरेंद्र कडू यांच्याकडे असेल. डॉ. सुजाता नातू, डॉ. नंदकिशोर कपोते, डॉ. स्वाती दैठणकर आणि निकिता मोघे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.

भरतनाट्यम आणि नृत्ययोगा अभ्यासक्रमाची जबाबदारी भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्याकडे असेल, तर डान्स आणि कोरिओग्राफी या विषयाशी निगडीत जबाबदारी नृत्यदिग्दर्शिका आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे पाहणार आहेत. तसेच कथक नृत्याची जबाबदारी डॉ. नंदकिशोर कपोते यांच्याकडे असेल.

Spread the love