Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयाचे ‘कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धेत यश.

आकुर्डी ः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सप्ताहानिमित्त डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध यांच्याकडून ४ व ५ जानेवारी रोजी ‘कर्मवीर करंडक आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डाॕ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डीच्या पथनाट्य संघाने व्दितीय क्रमांक मिळविला.

या पथनाट्य स्पर्धेत ४० संघाने सहभाग नोंदविला होता. महाविद्यालयाने ‘वाहतूक नियम व नागरिक’ या सामाजिक विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. या पथनाट्याची संहिता ताहा खान या विद्यार्थीनीने लिहिली होती. अत्यंत अतीतटीच्या स्पर्धेत महाविद्यालयाने व्दितीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य संघ स्पर्धेत सहभागी झाला होता. या संघात ताहा खान, जगदीश चोरघडे, पायल विश्वकर्मा, विकास वैरागे, प्रांजल शिंदे, वैष्णवी कामथे, युक्ता परीहारिया, साक्षी शिंदे, दुर्वाक्षी महाजन, हर्षदा गायकवाड, धनश्री पिंजरकर, सचिन गडदे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. सतिश ठाकर व प्रा. भागवत देशमुख यांनी जबाबदारी पार पाडली.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.पी. डी. पाटील सर, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त मा. डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Spread the love