Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

डॉ. अंजली आवटे यांनी युनायटेड नेशन्स ग्लोब हा आंतरराष्ट्रीय किताब पटकावला

( युनायटेड नेशन्स पेजेंट या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिळवले यश )

  सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप केवळ शारीरिक सौंदर्य एवढ्या-पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते. याच्याच जोरावरती डॉ. अंजली आवटे यांनी युनायटेड नेशन्स पेजेंट या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील विविध देशामधील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सौंदर्य, बुद्धिमत्ता, कला- क्रीडा व राष्ट्रीय वेशभूषा, तसेच को प्रोजेक्ट वर्क याच्या आधारे गुणवाटप करण्यात आले होते. अंतिम फेरीमधे डॉ. अंजली आवटे यांनी “युनायटेड नेशन्स ग्लोब- २०२३  ” हा किताब पटकवला आहे.

कुटुंबाची व स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी हे विजेतेपद पटकावल्याने समाजमाध्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डॉ. अंजली म्हणल्या की खऱ्या अर्थाने लहानपणी मी पाहिलेले स्वप्न  ‘युनायटेड नेशेन्स ग्लोब हा बहुमान मिळवत पूर्ण झालेल्याचे समाधान वाटत आहे. माझ्या यशाचे श्रेय माझे पती डॉ. संदीप आवटे आणि माझे कुटुंब यांना जाते.

Spread the love