Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

दिमाखदार सोहळ्यात ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान 

 – एच. आय. व्ही. ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी देणार निधी 

पुणे : कशीश प्रॉडक्शन्सच्या वतीने पुणेकर प्रतु फाउंडेशनच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या  ‘ ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला.  पुरस्कार सोहळ्याचे यंदा तिसरे पर्व होते. या पुरस्कार सोहळ्याला राजसा ईशान एथेनिक कलेक्शन यांचे विशेष सहकारी लाभले.  

अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला कशीश प्रॉडक्शन्सचे संस्थापक,  मॉडेल ग्रुमर व अभिनेता – दिग्दर्शक योगेश पवार, पुणेकर प्रतु फाउंडेशन संस्थापक प्रतिक शुक्ल, शो डायरेक्टर पुजा वाघ, प्रियांका मिसाळ, अंकुश पाटील,नेहा घोलप पाटील , सुनील हिरूरकर (असिस्टंट टू आय जी पोलीस,एम टी, महाराष्ट्र स्टेट),यामिनी खवले, गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे, चेतना बीडवे, प्रियंका कुकडे,उमेश पवार,कृष्णा देशमुख आदि मान्यवर  उपस्थित होते.

आयोजक संस्थेच्या वतीने यातील काही निधी हा एच. आय. व्ही. ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ पुरस्काराच्या यंदाच्या तिसऱ्या पर्वात अभिनेते सुनील गोडबोले (जीवनगौरव पुरस्कार), सामाजिक कार्यासाठी तृप्ती देसाई यांना विशेष पुरस्कार, तसेच अभिनेते, दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मीरा जगन्नाथ ,  माधवी निमकर, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, , अशोक फळदेसाई, तेजस बर्वे, संतोष पाटील,  वैभव चव्हाण, रुचिरा जाधव, अरबाज शेख, सोनाली पाटील, सिद्धार्थ खिरीड आणि अक्षया देवधर  यांना मान्यवर उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी  दिग्दर्शक, मेकअप आर्टीस्ट, फॅशन, अभिनय, बिजनेस, डॉक्टर, मॉडेल, सामाजिक कार्यकर्ते, वास्तू तज्ञ आशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.

Spread the love