Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

निलेश शिंदे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद; यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला गती मिळेल-प्रशांत जगताप (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी पुणे)

कोथरुड, दि. २४ जुलै: आपल्या वापरात नसलेले पण इतरांना उपयोगी ठरेल अशा अनेक वस्तू आपल्याकडे अडगळीत पडून असतात. ती वस्तू गरजवंताला मिळाली तर त्याचे जीवन बदलून जाते.

यावर सखोल विचार करुन शहरभरातून २५० सायकल गोळा करत त्या गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे निलेश शिंदे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या विकासाला गती मिळेल असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उत्सव कार्यालय, कोथरुड येथे आयोजित केलेल्या सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी जगताप प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

माजी उपमहापौर दीपक मानकर,पेडल मिशनचे संस्थापक आनंद वांजपे, राष्ट्रवादी कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने, हर्षवर्धन मानकर, संतोष डोख ,महेश हांडे, ज्योती ताई, नवनाथ खिलारे, धनंजय पायगुडे, सूर्यवंशी,दिलीप कानडे, सीताराम तोंडे पाटील, सचिन जोरी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष निलेश दामोदर शिंदे, सौ. तृप्ती निलेश शिंदे, त्रिमुर्ती मित्र मंडळ आणि मंदार शिंदे यांनी केले.

समाजातील गरजवंतांसाठी काही करायची इच्छा असते परंतु खरा गरजवंत शोधणे व त्याला आवश्यक असलेली वस्तू देणे महत्त्वाचे असते.

संयोजक निलेश शिंदे म्हणाले की, सायकल वाटपाची ही संकल्पना आनंद वांजपे सर यांच्यामुळे मिळाली. लोकांना केलेल्या आवाहनातून २५० सायकल मिळाल्या.

त्या दुरुस्त करुन उपमुख्यमंत्री अजित दादांच्या वाढदिवसाचे निमित्ताने वाटप करण्यात येत आहे. आणखी विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली आहेत.

त्यांनाही सायकल देण्याचे काम आम्ही नक्की करु. 2001 पासून पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे.

नजीकच्या काळात महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत.

आनंद वांजपे म्हणाले की, एक मुलगी तीची जुनी सायकल देवून नवीन विकत घ्यायला आली होती. तीला व तीच्या वडीलांना आम्ही आमच्या मनातील संकल्पना सांगितली.

त्यांना ती खुप आवडली आणि तीने आम्हाला गरजू विद्यार्थ्यासाठी भेट म्हणून सायकल दिली.

तीने दिलेल्या सायकलपासून आम्ही हा उपक्रम सुरु केला. त्याला खुप यश मिळत आहे.

वैभव कोठुळे यांनी सूत्रसंचलन केले. सौ. तृप्ती शिंदे यांनी आभार मानले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love