Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम

सर्व शाळांमध्ये फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशी सजावट करण्यात आली होती. मिकी माऊस, डोरेमॅन, छोटा भिम, फ्रेंड  गणेशा असे विद्यार्थ्यांना आवडणारे कार्टून्स स्वागतासाठी सज्ज होते.

सनई, चौघडा व तुतारींचे स्वर आणि बालगीते उत्साहात भर घालत होती. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. गुलाबाची फुले देण्यात आली.

रानडे बालक मंदीरात ‘स्वच्छतेच्या सवयी’चे प्रबोधन करणारे कटआऊटस् लावण्यात आले होते. नवीन मराठी शाळेत सेवा-सहयोग संस्थेच्या सहकार्याने चारशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेत आजपासूून योग सप्ताह सुरु करण्यात आला. योगासनाची प्रात्याक्षिके करुन घेण्यात आली. ‘ओमकार आणि योगाभ्यास यांचे अभ्यासाशी नाते’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संगीताच्या माध्यमातून सूर्य नमस्कार आणि योगासने या ‘संगीत योग’ विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी डीईएसच्या संस्थापकांच्या वेशभूषा साकारल्या. 
डीईएस, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत रंगीबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. स्वागतास उभे असलेले आवडते कार्टून्स पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला. विद्यार्थ्यांसाठी पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते.

वर्गामध्ये गप्पा-गोष्टी आणि गाणी झाली. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (एनईएमएस) शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण जतन करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.

अवनी उकिरडे आणि तिचे वडील प्रमोद उकिरडे या दोघांचा आज शाळेचा पहिला दिवस ठरला. अवनीने एनईएमएसमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला, तर तिचे वडील प्रमोद आज त्याच शाळेत कि‘डा शिक्षक म्हणून रुजू झाले.    

अहिल्यादेवी प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींनी पुष्पवृष्टी आणि औक्षण करून पाचवीच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. विद्यार्थिनींनी सरस्वती पूजन केले. स्वागतासाठी नृत्य आणि संगीताच्या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तारांगणाची सफर केली. प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगीत शाळा आदींचा परिचय करुन देण्यात आला. छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवनातील बोधकथा सांगितली.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेचे ब्रीदवाक्य असणार्‍या ‘एकी हेच बळ’ या विषयावर आधारित नाट्यछंद वर्गाच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांना पेढे, अक्षरपाटी, पुस्तके भेट देण्यात आली.

Spread the love