Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतुन भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान”

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतुन व प्रभाग क्र.०९ भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान” हा कार्यक्रम बाणेर येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रम आज संपन्न झाला.

सदर कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री. जगदीशजी मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडला.

दरम्यान प्रभागात होणाऱ्या विविध विकासकामांबाबत आणि मिसकॉल देऊन पक्षात महिलांना सक्रिय होण्याची संधी देण्याचा हा अनोखा उपक्रम याआधी पक्षात कुणीही राबवलेला नव्हता, अशा शब्दांत चित्राताईंनी या कार्यक्रमादरम्यान बोलताना माझे कौतुक केले.

तसेच मा. जगदीशजी मुळीक बोलताना म्हणाले की, अमोल नेहमीच प्रभागात नवनवीन उपक्रम घेत असतात आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित असतो. एखादा व्यक्ती समाजासाठी खूप चांगले कार्य करत असतो त्यावेळी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे खूप गरजेचे असते, जेणेकरून तो अधिक उत्साहाने समाजाप्रती काम करण्यास स्वतःला झोकून देईल.

दरम्यान कोविड काळात ज्या महिलांनी स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता समाजातील लोकांसाठी काम केले, त्यांच्या या बहुमोल योगदानाचा सन्मान आज आम्ही आमच्या परीने केला याचे त्यांनी खूप कौतुक केले.

यावेळी डॉ. संपदा तांबोळकर, डॉ. आसावरी मांजरेकर, डॉ. रुपाली गुलवानी, डॉ. स्मिता इंगळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. अर्चना डंगरे, डॉ. तृप्ती पारे, डॉ. सुषमा जाधव, डॉ. अनिता बापट खांदवे, डॉ. प्रीती नेवे, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. दीपाली चव्हाण, डॉ. निकिता लोणकर, डॉ. प्रमिला क्षीरसागर, डॉ. योगिता कचरे, डॉ. सोनाली शेळके, डॉ. अंकिता चव्हाण, डॉ. अमृता रॉड्रिग्ज, डॉ. जयश्री कर्पे, डॉ. माधवी राराविकर, डॉ. कोमल कापसे, डॉ. स्नेहल दुश्मन, डॉ. श्रद्धा आव्हाळ, डॉ. सुश्मिता मोटे, डॉ. निकिता भोसे आदी महिला डॉक्टर्स तसेच नमिता शेट्टी, कोमल मुजमाल, सुप्रिया घोरपडे, श्रद्धा मुदलीक, जेन्सी जॉन आदी महिला परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच सौ. सुप्रिया सदाराम पांढरकर, सौ. वनिता विश्वास जाधव, सौ. रोहिणी तुकाराम पांढरकर, सौ. मयुरी राजेंद्र नलावडे, सौ. श्वेता सुभाष शिंदे आदी महिला पोलीस आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता बाहेती, सौ. अंबिका नायर, सौ. वल्लरी कांबळे, सौ. उल्का शाह, सौ. अंजली केळकर या महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, पुणे भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीशजी मुळीक, भाजपा नेते श्री. राहुल कोकाटे, स्विकृत नगरसेवक श्री. सचिन पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा सौ. उमाताई गाडगीळ, प्रभाग क्र. ०९ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. स्वरुपा शिर्के, महिला आघाडी सरचिटणीस सौ. अस्मिता करंदिकर
श्री. शशिकांत बालवडकर, श्री. मनोज कुमकर, कोथरुड वि. युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. कृष्णा बालवडकर, प्रभाग उपाध्यक्ष श्री. विशाल बालवडकर, श्री. अतुल आमले, श्री. अनिल ससार, सरचिटणीस श्री. रोनक गोटे, श्री. मंदार राराविकर, श्री. रोहित पाटील, श्री. सुभाश भोळ, श्री. गणेश पाडाळे, श्री. दादा गायकवाड, योगेश बालवडकर, प्रविण बालवडकर, श्री. विशाल बालवडकर, श्री. सुधीर बालवडकर, श्री. आकाश बालवडकर, श्री. शुभम बालवडकर, श्री. विराज बालवडकर, श्री. रोहित बालवडकर, श्री. निलेश बालवडकर, श्री. अमोल पाडाळे, श्री. जालिंदर भंडारी, श्री. वैभव बालवडकर, श्री. वैभव टकले, श्री. सुमित कांबळे, श्री. प्रसाद बालवडकर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सभासद व सर्व कोविड योद्धा महिला व नवीन भाजपा महिला सभासद उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडी सरचिटणीस सौ. अस्मिता करंदिकर यांनी केले.


संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342/
8087990343

Spread the love