Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. उत्तमराव भूमकर यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

पुणे – दि. १ ऑगस्ट २०२२,
पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. उत्तम भूमकर यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम आज काँग्रेस भवन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

यावेळी कै. उत्तमराव भूमकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पुणे शहर काँग्रेसचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यचवहारे, रफिक शेख, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, लता राजगुरू, नीता रजपूत, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, सुनिल शिंदे, नरेंद्र व्यवहारे, रजनी त्रिभुवन, विजय मोहिते, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘‘आधार स्मरणिका २०२२’’ चे प्रकाशन करण्यात आले व कै. उत्तमराव भूमकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काँग्रेस भवन येथे झाड लावण्यात आले.

या प्रसंगी बोलताना संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर म्हणाले की, ‘‘कै. उत्तमराव भूमकर यांनी संघटनेची स्थापना करतानाच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची व ज्येष्ठांची कुटूंबातील व्य क्तीप्रमाणे जबाबदारी घेण्याचे काम दादांनी केले. वर्षभरात अनेक नवनविन कार्यक्रम ज्येष्ठांसाठी घेवून काँग्रेस भवन हे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रच बनविले होते.

डॉ. विनोदजी शहा यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक आरोग्याच्या सुविधा मोफत मिळवून देऊन ज्येष्ठांवरील खर्चाचा ताण त्यांनी कमी केला. स्वत: त्रास घेवून ज्येष्ठांची पूर्ण काळजी घेणाऱ्या दादांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो.

कार्यक्रमाची सुरूवात ह.भ.प. दिनकराव जावळकर यांच्या प्रवचनाने झाली. यावेळी उल्हास पवार यांनी कै. भूमकर यांच्या काँग्रेस पक्षातील योगदानाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक गुडमेटी, शिवाजी भेगडे, सुलभा भोंडवे, शालीनी शिंदे, शिवाजी दारवटकर, एम. एम. फुलगावकर आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले तर आभार सुलभा भोंडवे यांनी मानले.

आपला विश्वासू
(द. स. पोळेकर)
अध्यक्ष
पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघ

Spread the love