Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे मेगा ग्राहक संपर्क अभियान संपन्न

पुणे – स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे महा ग्राहक संपर्क अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबईच्या केंद्रीय कार्यालयाचे कार्यकारी संचालक राजीव पुरी यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून व पुष्प अर्पण करून करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी फील्ड महाप्रबंधक बी बी मुटरेजा ,उपमहाप्रबंधक संदिप्त कुमार पटेल,
वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक राजेश मेहरा, मुख्य प्रबंधक राजीव तिवारी उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देशभरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे आणि देशाच्या अदम्य भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आम्ही पावलो पावली कटिबद्ध असल्याची भावना सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईच्या केंद्रीय कार्यालयाचे कार्यकारी संचालक श्री राजीव पुरी यांनी व्यक्त केली.

पुण्यात नुकत्याच झालेल्या महा ग्राहक संपर्क अभियान उपक्रमांतर्गत आयोजित पत्रकार परिषदे मधे ते बोलत होते. ते म्हणाले, पारंपारिक आणि आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा आमच्या संस्थे द्वारे पुरवल्या जात असून सध्याचा उद्योग आणि व्यवसाय एक कोटींवरून २५ कोटींपर्यंत वाढवण्यासाठी बँकेने सेंट प्रगती नावाची आकर्षक योजना सुरू केली आहे, जी सुलभ अटींवर आणि किमान व्याजदरावर उपलब्ध आहे.

राजीव पुरी म्हणाले की, बँकेकडे ठेवी, कर्ज आणि सहायक सेवांशी संबंधित विविध योजना मुबलक प्रमाणात आहेत. सध्या आमच्या संस्थेच्या सुमारे 4600 शाखांचे नेटवर्क आहे आणि 5 कोटींहून अधिक खातेदार जोडलेले आहेत. भारतात युवाशक्ती प्रस्थापित करण्यासाठी शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक कर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय भारत सरकारच्या अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, जन धन योजना, सुकन्या योजना इत्यादी विविध विकास आणि सामाजिक सुरक्षा संबंधित योजनांच्या अंमलबजावणीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने प्रशंसनीय कार्य केले आहे.

Spread the love