Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अभियान प्रतिष्ठान तर्फे मडगनी गावात मदत

मुक्काम पोस्ट मडगनी, ता.वाई, जिल्हा सातारा हे गाव तसं नकाशात सापडणारही नाही इतकं चिमुकलं ! धोम धरणाच्या वरती डोंगरात लपलेलं !

पण या महापुराने त्या गावाची पुरती वाताहात करून टाकली. रस्तेच काय, शेतीही वाहून गेली.

पिढ्यान पिढ्या ज्या जमिनीच्या भातावर पोसल्या ती मातीच वाहून गेली आणि उरले ते दगड-गोटे..!

अभियान प्रतिष्ठान* यांच्या वतीने, त्या भागात कार्यरत असणारे श्री.प्रशांत डोंगरे यांच्या सांगण्यावरून आम्ही त्या गावातील कुटुंबाना कोरडा शिधा, साड्या, कपडे, बादल्या, भांडी, कपडे, चटई, खराटा, सुपली, चपला इत्यादी मदत करून त्या गावकऱ्यांच्या संकटात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

आम्ही केलेली मदत फार अपुरी आहे याची जाणीव आम्हाला आहे.

आभाळच फाटलंय, कुठं कुठं म्हणून ठिगळं लावणार ? तरीही त्या गावातील आया-बहिणींच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव खूप खूप समाधान देऊन गेले..!

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love