Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

बायजूस पुण्‍यात लाँच करत आहे ‘बायजूस ट्युशन सेंटर’

४थी-१०वी मधील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कौशल्यांसाठी उपलब्ध करून देत आहे सर्वोत्तम ऑफलाइन व ऑनलाइन अध्ययन पद्धती
पुण्‍यामध्ये १४ केंद्रे कार्यान्वित होणार
या वर्षांत २०० शहरांमध्ये मिळून ५०० केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट
या वर्षात देशभरात १०,००० हून अधिक रोजगार निर्माण होणे अपेक्षित
पुढील दोन वर्षांत १० लाख विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचे उद्दिष्ट

पुणे, : बायजूस या, ११५ दशलक्ष नोंदणीकृत विद्यार्थ्यांसह, जगातील आघाडीच्या एडटेक कंपनीने आज पुण्‍यामध्‍ये ‘बायजूस ट्युशन सेंटर’ लाँच करत असल्याची घोषणा केली. बायजूस ट्युशन सेंटर विद्यार्थ्यांसाठीचा अशा प्रकारचा एकमेव सर्वसमावेशक कार्यक्रम असून, ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या अध्ययन अनुभवांतील सर्वोत्तम बाबी यात एकत्र करण्यात आल्या आहेत. शहरामध्‍ये ५ केंद्रे आहेत, जी सध्‍या कार्यरत आहेत आणि या वर्षाच्‍या अखेरपर्यंत एकूण १४ केंद्रे स्‍थापित करण्‍यात येतील.

नवीनच लॉंच करण्‍यात आलेली बायजूस ट्युशन सेंटर्स बानेर, कोरेगाव पार्क, विमन नगर व हडपसर अशा केंद्रीकृत ठिकाणी व सुलभपणे उपलब्‍ध होणाऱ्या क्षेत्रांमध्‍ये उभारण्‍यात आली आहेत.

इयत्ता ४-१० मधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली बायजूसची ट्युशन सेंटर्स ही परिसरातील तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या सक्षम अशी प्रत्यक्ष ट्युशन सेंटर्स असतील. टू टीचर (दोन शिक्षक) मॉडेलच्या माध्यमातून, आंतरक्रिया व अधिक चांगल्या निष्पत्तीवर भर देणारा, जागतिक दर्जाचा अध्ययन अनुभव ही सेंटर्स पुरवणार आहेत.

प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या १०० केंद्रांमधून सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे, बायजूस २०२२ मध्ये २०० शहरांमध्ये मिळून अशा प्रकारची ५०० केंद्रे सुरू करणार आहे.

बायजूस ट्युशन सेंटर सर्वांगीण अध्यापन व अध्ययन प्रणालीद्वारे शाळेनंतरच्या शिक्षणाची व्याख्या नव्याने करतीलच, शिवाय कार्यान्वित झाल्यानंतर वर्षभराच्या काळात भारतभरात १०,००० हून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील. पुढील दोन वर्षांत १० लाख विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी करावी असे उद्दिष्ट बायजूसने ठेवले आहे.

बायजूस ट्युशन सेंटर्सचे प्रमुख हिमांशु बजाज या लाँचबद्दल म्हणाले, “बायजूस ट्युशन सेंटर भारतातील शैक्षणिक हब पुणे येथे सुरू होत आहे हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे लॉंच दर्जेदार शिक्षणाला वैयक्तिकृत, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करणाऱ्या स्‍वरूपात बनवण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

कोविड साथीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन व ऑनलाइन अशा अध्ययन पद्धतींमध्ये हेलकावे खावे लागले पण बायजूसचे हे नवीन उत्पादन देशभरातील विद्यार्थी व पालकांच्या जटील प्रश्नांवर तोडगा काढेल. बायजूस ट्युशन सेंटर हे व्यक्तिनुरूप अध्ययनाच्या दिशेने टाकलेले पुढील पाऊल आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांना टेक-एनेबल्‍ड प्रत्यक्ष केंद्रामध्ये द्विशिक्षक (टू टीचर) मॉडेल्‍स, आणि प्रगती व कामगिरीच्या विश्लेषणाधारित मूल्यांकनाद्वारे शिक्षक-विद्यार्थी यांच्यात व्यक्तिगत संबंधयांचा लाभ देते.

विद्यार्थ्‍यांना बायजूसच्या ऑनलाइन परिसंस्थेमध्ये प्रवेश देखील मिळेल. विद्यार्थ्यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवत ही टेक-एनेबल्‍ड प्रत्‍यक्ष केंद्रे विद्यार्थ्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता अधिक निपुण करण्‍यासाठी जागतिक दर्जाचे अध्‍ययन व व्‍यक्तिनुरूप शिक्षण देण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आली आहेत.”

बायजूस ट्युशन सेंटरमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान, शिक्षक आणि फॉरमॅट्स यांचा मेळ साधण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण व प्रभावी अध्ययन अनुभवाची निश्चिती होते. मानकीकृत अध्यापन पद्धतींमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांशी खोलवर जोडून घेणे शक्य होते. त्याचबरोबर अधिक चांगल्या निष्पत्तीची खात्री करणारा श्रेष्ठ दर्जाचा अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.

कोणत्याही क्षणी शंका निरसन करण्याची सुविधा, नियमित चाचण्या/सराव सत्रे व वारंवार होणाऱ्या पालक-शिक्षक भेटी अशी वैशिष्‍ट्ये आणि तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही जगातील सर्वोत्तम अनुभव मिळतो. उच्च दर्जाचे शिक्षक आणि व्यक्तिनुरूप लक्ष दिले जाणे या दोहोंचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो.

विद्यार्थ्यांना अध्ययनातील तफावती भरून काढण्याची संधी मिळावी, संकल्पना समजून घेण्यात बळकटी यावी आणि परीक्षा सज्जतेची ग्वाही देणाऱ्या नियमित चाचण्या व सरावाच्या माध्यमातून अध्ययन सशक्त व्हावे अशा पद्धतीने बायजूस ट्युशन सेंटर्सची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाइन व ऑनलाइन वर्गांसाठी समान शिक्षक दिली जातील. हे शिक्षक त्यांच्या व्यक्तिनुरूप अध्ययन प्रवासात त्यांना सहाय्य करतील.

बायजूसने ही सेंटर्स लाँच करून आपला विद्यार्थी-केंद्री दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. तसेच विद्यार्थ्याच्या खऱ्या गरजा समजून घेऊन, नवीन व कल्पक अनुभव,उत्पादन व सेवा निर्माण करण्याप्रती असलेली बांधिलकीही दृढ केली आहे. कोविडउत्तर जगाचे भवितव्य संमिश्र अध्ययन हेच असल्याने, या फॉरमॅटमध्ये बायजूस ट्युशन सेंटर नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे.

गेल्या वर्षी कंपनीने आपल्या विद्यार्थ्यांच्या लाभासाठी टू-टीचर मॉडेलसह बायजूस क्लासेस सुरू केले होते. ११५ दशलक्ष नोंदणीकृत विद्यार्थी आणि ७ दशलक्ष पेड सबस्क्रिप्शन यांच्यासह बायजूसचा वार्षिक नूतनीकरण दर ८६ टक्के आहे. बायजूसच्या एज्युकेशन ऑफ ऑल या सामाजिक उपक्रमाखाली, बायजूसने ३.४ दशलक्ष मुलांना डिजिटल अध्ययनाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास मदत केली आहे आणि २०२५ पर्यंत वंचित समुदायांमधील १ कोटी (१० दशलक्ष) मुलांना सक्षम करण्याचे ध्येय कंपनीपुढे आहे.

Spread the love