Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भारतातील पहिली स्किल्स लॅब ज्यामध्ये नेत्र शस्त्रक्रियांच्या प्रशिक्षणासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा समावेश

नेत्र शस्त्रक्रिया कौशल्य प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्रामधील नेत्र शस्त्रक्रिया कौशल्य प्रशिक्षण प्रयोगशाळेचे (क्लिनिक सिम्युलेशन अँड स्किल्स लॅब) उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय शाखांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानासह सुसज्ज अशी कौशल्य प्रयोगशाळा (स्किल्स लॅब) निर्माण केली आहे.

आरोग्य सेवांसंबंधीत डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ आदीच्या कौशल्यामध्ये व कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे तसेच रुग्णाची सुरक्षा व काळजीपूर्वक कौशल्य विकसित व्हावे. हा या स्किल लॅबचा मुख्य उद्देश आहे. या दृष्टिकोनातून कौशल्य प्रयोगशाळा आकारास आली आहे.

डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मॅन्युअल स्मॉल इन्सिजन मोतीबिंदू सर्जन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमुल्य साहू व कार्याध्यक्ष डॉ. जगन्नाथ बोरामणी यांच्या हस्ते नेत्र शस्त्रक्रिया कौशल्य प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले यावेळी डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता, कॉर्पोरेट विभागाचे संचालक, वैद्यकीय अधीक्षक, कौशल्य प्रयोगशाळेचे प्रमुख, नेत्ररोग विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

नेत्र शस्त्रक्रियांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवाच्या डोळ्याची प्रतिकृती या तंत्रज्ञानात अंतर्भूत करण्यात आली आहे. त्याद्वारे विविध प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रियाचे कौशल्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना प्राप्त होणार आहे. एकावेळी दोन सर्जन प्रशिक्षण घेऊ शकतील. नेत्र शस्त्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व पुनरावलोकनाची सुविधा देखील उपलब्ध आहे. या वैशिट्यांसह प्रशिक्षणातून कुशल ज्ञानपूर्ण डॉक्टर्स घडवणे हा उद्देश आहे. याकरीता डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हेल्पमीसी संस्थेशी सामंजस्य करार देखील केला आहे.

या कौशल्य प्रयोगशाळेत गर्भधारणेपासून प्रसूतीसह, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लागणारी वैद्यकीय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते तसेच शैक्षणिक विषय संदर्भातील वैद्यकीय साधनसामग्रीचे प्रदर्शन स्किल लॅबमध्ये भरवले आहे. त्याद्वारे पदवी, पदयूत्तरपदवी, विशेष तज्ञ, अनुभवी तज्ञ, शल्यचिकित्सक तसेच नर्सिंग स्टाफला प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षणासाठी माहिती फलक, विविध प्रकारचे अत्याधुनिक मॉडेल, संगणकीय तंत्रज्ञान आदींचा उपयोग करण्यात येतो. या साहित्याबरोबरच प्रशिक्षणादरम्यान दृकश्राव्य माध्यमांचाही वापर करण्यात येतो तसेच रुग्णाना इंजेक्शन, सलाईन, सी पी आर देणे, श्वसन नलिका, अन्न नलिका, हृदय, नेत्र, मज्जासंस्था, अस्थिरोग, बाल शल्य चिकित्सा एंडोस्कोपिक, लॅपरोस्कोपिक, कॉलोनोस्कोपी, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, प्रथोमोपचार प्रशिक्षण आदी देण्यात येते ही या प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये आहेत.

“वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये कौशल्य शिक्षणावर जास्तीत जास्त भर देणे हा आमचा मानस असून त्यासाठी अद्ययावत प्रगत साधनाचा अंतर्भाव या स्किल्स लॅब मध्ये केला आहे” असे कुलपती डॉ. पी. डी पाटील यांनी सांगितले ते पुढे म्हणाले आज या लॅबमध्ये नेत्र शस्त्रक्रियांच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा समावेश असणारी भारतातील पहिली स्किल्स लॅब आहे याचा मनापासून अभिमान वाटतो.

Spread the love