Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अशोक हांडे आणि रंजना हांडे यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

समाजाची बदलती व्याख्या आणि बदलता अर्थ खेदजनक- उल्हासदादा पवार, ज्येष्ठ नेते

पुणेः-सामाजिक विषमता मोडून अस्पृश्यता निवारण करण्याचे महात्मा गांधीचे धोरण यशवंतराव चव्हाणांनी अवलंबिले होते. कारण समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक आणि विस्तारलेली होती. आज मात्र समाजाची व्याख्या आणि अर्थ बदलतो आहे, याचा खेदa वाटतो, असे मत ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येणारा 2021 वर्षीचा यशवंत वेणू पुरस्कार निर्माता,लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, कलादिग्दर्शक, गायक, अभिनेता आणि सूत्रसंचालक अशा विविध भुमिकेत सहज वावरणारे अशोक हांडे आणि त्यांच्या पत्नी रंजना अशोक हांडे यांना उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब शिवकर, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमित गोखले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उल्हासदादा पवार म्हणाले की, राजकारणात वावरत असताना आपल्या या क्षेत्राचा स्पर्श व्यक्तीगत स्वार्थाला आणि कौटुंबिक स्वार्थाला होऊ न देणारे व्यक्तीमत्ल म्हणजे यशवंराव चव्हाण होते. यशवंतरावांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणात सामाजिक अभिसरणाचा पाया होता.

जातीनिष्ठ आणि उपजातीनिष्ठ राजकारणदेशासाठी घातक आहे, असे सांगणारे यशवंतराव समाज विकासाच्या सर्व स्तरांना कायम महत्त्व देणारे होते. त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ रस्ते, धरणं आणि संस्थांची उभारणी एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तर विकासाचे दोन डोळे आहेत असे यशवंतराव नेहमी म्हणायचे.

त्यातील एक डोळा भौतिक विकासाचा तर दुसरा डोळा साहित्य आणि संस्कृतीचा आहे, असे म्हणणा-या यशवंतरावांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून या दोन्ही डोळ्यांना कायम समान स्थान दिल्याचे दिसून येते. लोकसंस्कृतीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते तसेच कलावंत आणि साहित्यिकांबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. हा आदर त्यांनी नेहमीच आपल्या कृतीतून व्यक्त केलेला दिसून येतो.

यावेळी बोलतांना अशोक हांडे म्हणाले की, सह्याद्रीचा बाणा असलेले यशवंतरावांचे व्यक्तीमत्व हे हिमालयासारखे उत्तुंग होते. आपल्या कणखर भूमिकेतून देशाचे डोके म्हणजे काश्मीर वाचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी यशवंतराव चव्हाण यांनी करून दाखवली. लहानपणी गर्दीत हरवू नये म्हणून आपल्या आईचे बोट घट्ट धरून वाटचाल करणा-या यशवंतरावांनी पुढील संपूर्ण आयुष्यात आईच्या विचारांचे बोट कधीच सोडले नाही.

त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करणा-या यशवंतरवांचे बोट आपण सोडून चालणार नाही. भविष्याचा वेध घेत महाराष्ट्राला परिपूर्ण विकासाच्या वाटेवर चालायचे असेल, तर यशवंतरावांचे बोट धरूनच आपल्याला पुढे जावे लागेल.

लोकशाहीवर कायम विश्वास ठेवणारे यशवंतराव नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. त्यांनी जपलेला वसा, वारसा आणि संस्कृती ही पुढच्या पिढीला समजावून सांगण्याची जबाबदारी आपल्यावर येते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धात शांता शेळके यांच्या गीतांवर आधारीत जीवन गाणे गातच रहावे, हा कार्यक्रम सादर झाला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येणारा यशवंत वेणू पुरस्कार अशोक हांडे आणि त्यांच्या पत्नी रंजना अशोक हांडे यांना प्रदान करतांना उल्हासदादा पवार. यावेळी सत्यजीत धांडेकर, प्रवीण बर्वे, बाळासाहेब शिवरकर, पृथ्वीराज सुतार, रंजना हांडे, अशोक हांडे, पवार, सुनील महाजन, अमित गोखले आदी.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love