Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अली दारूवाला यांची रुबी हॉलच्या सल्लागार पदी नियुक्ती

पुणे : येथील सामाजिक कार्यकर्ते अली दारूवाला यांची ग्रँट मेडिकल फाउंडेशन संचालित रुबी हॉल या हॉस्पिटलच्या सल्लागार पदावर नियुक्ती झाली आहे .ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.परवेझ ग्रँट यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.’रुबी हॉल हे ९०० बेडचे देशातील अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरविणारे हॉस्पिटल आहे.

या हॉस्पिटलला अली दारूवाला नवीन उंचीवर घेऊन जातील’, असा विश्वास डॉ.परवेझ ग्रँट यांनी यावेळी व्यक्त केला.अली दारूवाला हे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत.अलीकडेच त्यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग(नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज) चे राष्ट्रीय सल्लागार म्हणूनदेखील नियुक्ती झाली आहे.

Spread the love