Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे-विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल – शरद पवार

पुणे- दि.२२ जानेवारी २०२३ – आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा तरून पिढीने घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री व अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषदेचे अध्यक्ष मा.श्री शरद पवार यांनी आज रविवारी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने पर्वती येथील शाहू कॉलेजच्या आवारातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या संकुलात स्थापन करण्यात आलेल्या डीएसटी प्रयास शाळा,रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन व हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण श्री.पवार यांचे हस्ते आज रविवारी झाले.

या वेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. सौ.प्रमिला गायकवाड,सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे चे अध्यक्ष श्री.दिलीप बंड , दै.सकाळ चे चेअरमन श्री.प्रतापराव पवार, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे, एस एम ई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री चंद्रकांत साळुंखे , अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस ॲड. संदीप कदम व ॲड. भगवानराव साळुंखे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार श्री. विजयसिंह जेधे, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे
आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

श्री पवार आपल्या भाषणात म्हणाले कि नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञाच्या आधाराची गरज असून त्यामुळे देशाच्या विकासासाठी ते विविध संशोधन करून विकास करतील.या साठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

स्टार्टअप व अन्य योजनांमुले ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होणार आहे.परंतु तरुणांनी या साठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे.संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल अशी आपेक्षा श्री पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

दै.सकाळ चे चेअरमन श्री प्रतापराव पवार म्हणाले कि स्टार्टअपमुळे तरुण उद्योजकांना उत्पादन निर्मितीची संधी मिळाली आहे उद्योजक, शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी या साठी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची गरज आहे.
सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क चे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले कि नवीन उद्योग व्यावसाय सुरु करण्यासाठी आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना संस्थेमार्फत सत्यात्याने प्रोत्साहन देत आहोत.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. सौ.प्रमिला गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगीतले की, संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या डीएसटी प्रयासशाळा व रोबोटिक्स प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना फायदा होणार आहे. एस एम ई चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष श्री चंद्रकांत साळुंखे यांचे हि भाषण या वेळी झाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपक गायकवाड व डॉ. गायत्री कांबळे यांनी केले. तर परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Spread the love