Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

तब्बल 105 वर्षा नंतर आनंदाने आयुष्याची सांगता!

कै.भिकुबाई शिवराम हुलवळे यांना शुक्रवार दिनांक १०.०३.२०२३ रोजी जांभळे येथे मुलीच्या घरी (दसूबाई केरभाऊ आरोटे) देवाज्ञा झाली.,,,,

माझ्या हुलवळे परिवारातील भिकुबाई ह्या सर्वात जास्त वयाने मृत्यू पावलेल्या आजी होय, कैलासवासी भिकुबाई शिवराम हुलवळे या जांभळे गावच्या सुन तर माहेर काळेचीवाडी येथील नामदेवराव मातेले परिवरातील कन्या होत, भिकुबाई यांना दोन मुली बायजाबाई शांताराम आरोटे व दसूबाई,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कै.शिवराम हुलवळे हे माझे आजोबांचे मोठे बंधू होते,शिवरामबाबा यांचे बंधू अहिल्याबाबा, माझे आजोबा हरिबाबा,आणि महादूबाबा होत, शिवरामबाबा हुलवळे यांना भागुबाई हांडे उंब्रज, अनुसयाबाई गवांदे जांभळे, सोनुबाई काळे काळेचीवाडी, या तीन बहिणी होत्या. कै.भिकुबाई या एकत्रित कुटुंब असताना व मी लहान असताना माझ्या आजी लक्ष्मीबाई, व आई रखमाबाई मला ‘शिवा’ नावाने सतत बोलवायच्या आणि माझ्यावर मनापासून प्रेम करायच्या,तसेच मी त्यांचा नांवकरी आहेस म्हणून माझे नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आले, असे मला लहाणपणी आजी लक्ष्मीबाई व आई रखमाबाई सांगायच्या,,,,,,

मी लहान असतानाच खरे तर आजोबांचे निधन झाले होते, परंतु आजी लक्ष्मीबाई, मी 5/6 वीला असताना शिवरात्रीच्या दिवशीच गेल्याचे आठवते, वडील, आई, आप्पा (काका ) गेल्यानंतर प्रेमाचा,मायेचा रांजण रिकामा झाल्याचे जाणवत आहे,,,,,,,,,,,,,अशा प्रेमळ आजींना 10 मार्च 2023 रोजी देवाज्ञा झाली,,,,,,,,, त्यांचा दशक्रिया विधी माझ्या जांभळे या जन्मगांवी गुरुवार दिनांक 16/03/2023 रोजी सकाळी आठ वा. होत आहे,,,,,,,,,,,,,माझ्या ।। छत्रपती न्यूज इंडियाच्या ।। वतीने, लालमहाल महोत्सव समितीच्या, वतीने, शिवप्रभू फाउंडेशनच्या वतीने, आजींना शेवटचे विनम्र अभिवादन! आणि भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली, ओम शांती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
: शोकाकुल :
खंडू महादू हुलवळे,
वसंत बबन हुलवळे, धोंडीभाऊ जयराम हुलवळे, केरू हरी हुलवळे
शिवाजी मारुती हुलवळे,
उषा शिवाजी हुलवळे,
रविंद्र प्रभू हुलवळे,
बबन केरू हुलवळे,
प्रतिक शिवाजी हुलवळे, ओजस्विनी शिवाजी हुलवळे,

Spread the love