Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अभिनेत्री स्वाती हनमघर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुणे : कोरोनाच्या काळात अनेक कलाकार आपापल्या परीने सामाजिक काम करत आहेत. अभिनेत्री आणि स्वेव युनिसेक्स स्पालॉन स्टुडिओ अकॅडमीच्या संचालिका स्वाती हनमघर या सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात.

यंदा त्यांच्या वाढदिवासानिमित्त स्वयं सिद्ध फाऊंडेशच्या वतीने तसेच लायन्स क्लब व रक्ताचे नाते चरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राम बांगड आणि मनीषा फाटे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी 60 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.

यावेळी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड,माजी नगरसेवक हरिश्चंद्र (अण्णा)दांगट, संतोष कदम(न्यू आर्या फाउंडेशन),हृषीकेश बालगुडे(सरचिटणीस पुणे शहर जि. काँ. कमिटी, प्राजक्ता माने(अध्यक्षा लायन्स क्लब मैत्री),अक्षय कोठारी(अध्यक्ष बी. एन. आय प्रीमियर),अमित पाटील(सोशल मीडिया महामित्र. महा. शासन),अजित पाटील(दिग्दर्शक),सागरराज बोदगिरे(संपर्क प्रमुख-ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन),पंकज हनमघर (अध्यक्ष स्व. विठ्ठल भाऊ हनमघर युवा मंच पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अभिनेत्री स्वाती हनमघर म्हणाल्या, कला, नाट्यक्षेत्रात किंवा चित्रपट क्षेत्रात काम करताना आम्ही कलाकार सामाजिक भान ठेवतो.

आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणिवेतून कोरोनाच्या काळात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेत आम्ही सेलिब्रेशनला फाटा देत रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून पुढील काळातही असे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love