Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

ABIL FOUNDATION Helping Hand As Always…..

ABIL Foundation तर्फे आज 50 ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पुणे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले.

आज देखील पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजनची नितांत गरज असल्याने, ABIL Foundation तर्फे आज 50 ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पुणे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले. तालुका स्तरावरील रूग्णालयांमध्ये प्रथमोपचार सेवेकरिता ग्रामीण भागातील रूग्णांना याचा नक्कीच उपयोग होईल.

भोर वेल्हे- 5 युनिट्समावळ- 5 युनिट्सपुरंदर- 5 युनिट्स बारामती- 5 युनिट्स जुन्नर- 5 युनिट्स खेड- 5 युनिट्स आंबेगाव- 5 युनिट्स दौंड- 5 युनिट्स इंदापूर- 5 युनिट्स शिरूर- 5 युनिटअन्न हेच पूर्णब्रह्म!

आज शुक्रवार दि. 21 मे 2021 पासून पुणे शहरातील कोरोना रूग्णसेवेला समर्पित केलेल्या डाॅ.नायडू रूग्णालयात ABIL Foundation तर्फे सकाळचा चहा नाष्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण अशा तिन्ही त्रिकालचा सकस आहार येथे उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांना देण्यास सुरुवात केली असून हा संकल्प यापुढे अविरतपणे रोज सुरू राहील.

येथील रूग्ण क्षमतेनुसार दाखल असलेल्या सर्व 225 रूग्णांना या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल. या संकल्पनेचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सर्व रूग्णांना आपल्या घरच्या जेवणाची कमतरता भासणार नाही अशा पध्दतीचे हे जेवण असेल याची सर्वतोपरी काळजी ABIL Foundation तर्फे घेण्यात येईल.

Spread the love