Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

जीवनावश्यक वस्तूंच्या १५ खेप रवाना

पुणे:कोथरूडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोकणातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा पुढे केला आहे. फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या मदतीने त्यांनी किमान एक महिना पुरेल इतका किराणा सामान, तसेच जीवनावश्यक वस्तू, औषधे उपलब्ध करून दिले आहेत.

आतापर्यंत एकूण १५ ट्रक कोकणासाठी रवाना झाले असून, आज तीन ट्रक सामान कोथरूड मधील श्री. पाटील जनसंपर्क कार्यालयातून कोकणातील चिपळूणसाठी रवाना झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या मदतीने कोकणातील चिपळूण आणि महाड मधील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामान उपलब्ध करून दिले आहे.

आतापर्यंत एकूण १५ ट्रक कोकणासाठी रवाना झाले असून, या मदतीचे तीन ट्रक आज कोकणातील चिपळूणसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड येथील जनसंपर्क कार्यालय येथून रवाना झाले आहेत.

यात प्रामुख्याने किरणा सामान, जीवनावश्यक वस्तू, मुलांसाठी शालेय साहित्य, ५००० लिटर पाणी साठवणूक टाक्या, टिकाऊ खाद्यपदार्थ, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येत आहेत.

आतापर्यंत १५ ट्रक साहित्य चिपळूण, महाड परिसरातील लोकांसाठी रवाना झाले आहे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love