Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ऍट मिडनाईटऍट मिडनाईट संपन्न

पुरूष गटात कालिदास हिरवे व महिला गटात ज्योती गवते विजयी

पुणे – शनिवारी रात्री १२.०१ वाजता सुरू झालेली ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा कालिदास हिरवे याने २ तास २४ मिनिटे ३२ सेकंदात वेळेत ४२.१ किमी अंतराची पुरूष गटाची पूर्ण मॅरेथॉन जिंकली. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ज्योती गवते हिने ४२.१ किमी अंतर ३ तास ६ मिनिटे ३ सेकंदात पूर्ण करून ही स्पर्धा जिंकली. पुण्यात पहिल्यांदाच करोनी परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रात्री १२ वाजता (मॅरेथॉन अॅकट मिड नाइट) घेण्यात आली आणि ती पूर्णत यशस्वी झाली. पुणेकरांनी रात्रीच्या या मॅरेथॉनलाही मोठा प्रतिसाद दिला.

शनिवारी रात्री ठीक १२ वाजून ०१ वाजता राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी सणस मैदाना बाहेर हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा प्रारंभ केला. या प्रसंगी ते म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर आता क्रिेडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन अशा प्रकारे सुरू ठेवल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले पाहिजे. यामुळे खेळाडूंना आंतराराष्ट्रीय क्रिंडा स्पर्धांमध्ये चांगली संधी मिळते असे सांगून त्यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

पुरूष आणि महिला या दोन्ही गटात सुमारे ४०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. करोना परिस्थितीमुळे व्हिसा मिळण्यात अडर्चीणी आल्याने आंतरराष्ट्रीय स्पधर्र्कांचा सहभाग यावेळी कमी होता. शनिवारी रात्री साडेबारा वाजता पुरूष व महिलांच्या अर्ध मॅरेथॉनचाही प्रारंभ झाला. या प्रसंगी हजारो पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

४२.१ किमीची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान येथून बाजीराव रस्त्याने शनिवारवाडा – मनपा व त्या पुढील चौकातून माघारी फिरून त्याच मार्गाने सणस मैदान व तेथून उजव्या हाताला वळून सिंहगड रस्त्याने लोकमत भवन – नांदेड सिटी येथे वळसा घालून परत सणस मैदान येथे असा २१ किमीचा पहिला टप्पा व पुन्हा त्याच मार्गाने जाऊन २१ किमीचा दुसरा टप्पा अशी स्पर्धा सणस मैदान येथे पूर्ण केली.

पुरूष व महिलांच्या २१ किलोमीटरच्या अर्ध मॅरेथॉनची सुरूवात सणस मैदान येथून त्याच मार्गाने जाऊन २१ किमी अंतर पूर्ण करत सणस मैदान येथे संपली. अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पुरूष गटात करण गहांदुले (१ तास १० मिनिटे ८ सेकंद) व महिला गटात प्राजक्ता गोडबोले ( १ तास २१ मिनिटे ५ सेकंद) हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले.

या स्पर्धेच्या मार्गावर डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ विशिष्ट अंतराने तैनात ठेवण्यात आला होता. तसेच सुमारे एक हजार ऑफिशियल्सव त्यांना मदत करणारे कार्यकर्ते या मार्गावर प्रत्येकी २५० मीटरनंतर खेळाडूंच्या मदतीसाठी सफा होते. या संपूर्ण मार्गावर प्रकाश राहील याची दक्षता पुणे महानगरपालिकेने घेतली होती.

या संपूर्ण मार्गावर पाणी, ज्यूस, स्पजिंग याची व्यवस्था करण्यात आली होती. सणस मैदान य १५ बेडचे छोटे हॉस्पिटल व फिजिओ थेरपी सेंटर उभारण्यात आले होते. तसेच मार्गावर दहा अॅेम्ब्युलन्स ठेवण्यात आल्या होत्या. या मॅरेथॉनमध्ये प्रारंभी दोन मोटरसायकल रायडर्स व त्यामागे ४२ सायकलपटूंनी रायडरची भूमिका बजावून खेळाडूंना मदत केली.

रविवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाचवाजता दहा किलोमीटर, सकाळी ६ वाजता ५ किलोमीटर आणि सकाळी साडेसहा वाजता व्हीलचेअर अशा स्पर्धा संपन्न झाल्या. या सर्व स्पर्धांमध्ये चार हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.
रविवारी, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते बक्षिस वितरण संपन्न झाले. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

करोना परिस्थिीतही स्पर्धेत खंड पडू नये आणि करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी रात्रीची ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने या स्पर्धेला रोख बक्षिसे दिली आहेत. याबद्दल पुणेमनपा तसेच सर्व डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, पंच, कार्यकर्ते व पत्रकारांचे त्यांनी आभार मानले.

डॉ. विश्वजित कदम यांनी प्रमुख खेळाडूंचा सन्मान केल्यावर म्हटले की, या स्पर्धेमुळे जगाच्या क्रिडा नकाशावर पुण्याचे नाव गेले आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र सातत्याने चालू ठेवणे अवघड असते असे नमूद करून गेली ३५ वर्षे मॅरेथॉन चळवळ पुण्यात समर्थपणे पुढे नेणार्याग संयोजक, कार्यकर्ते व सपोर्ट टीमचे कौतुक केले.

याप्रसंगी पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटाचे नेते आबा बागूल, माजी आमदार दिप्ती चवधरी, सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री इंदलकर, डॉ. राजीव येरवडेकर, कमल व्यवहारे,सुनील शिंदे, डॉ. राजीव जगताप, यांच्या हस्तेदेखील पूर्ण मॅरेथॉन पुरूष व महिला, अर्ध मॅरेथॉन पुरूष व महिला, १० व ५ किमी पुरूष व महिला आणि व्हील चेअर अशा ९ गटातील विजेत्यांना मेडल व सन्मान चिन्हं देण्यात आली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यात स्पर्धेच रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, ज्यॉइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, ज्यॉइंट रेस डायरेक्टर, गुरूबंनस् कौर, तांत्रिक समितीचे प्रमुख बाप्टिस्ट डुसूजा, वसंत गोखले व कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. आभार सचिन आडेकर यांनी मानले.

Spread the love