Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

२९ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचा
दि. १५ ऑक्टोबरला दिमाखदार शुभारंभ

खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते होणार उद्घाटन:
विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

‘महान नारीशक्ती’ला १० सिनेअभिनेत्रींकडून मानवंदना यंदाचे आकर्षण

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा दिमाखदार २९ वे वर्ष साजरे करीत आहे. नवरात्रात सलग १० दिवस चालू असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचा यंदाचा उद्घाटन सोहळा घटस्थापनेच्या दिवशी रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच,स्वारगेट,पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार हे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.

विशेष आकर्षण ‘महान नारीशक्ती’ला १० सिनेअभिनेत्रींकडून मानवंदना – ख्यातनाम अभिनेत्री अमृता धोंगडे, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, सानिया चौधरी, अदिती द्रविड, ऋजुता सोमण, कार्तिकी आदमाने, वैशाली जाधव, श्वेता परदेशी, सायली पराडकर आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती हे विशेष आकर्षण असेल.
’श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’’- विवीध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‘’श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’’ देऊन गौरविले जाते. डॉ. संजय मालपाणी (प्रसिद्ध उद्योजक), डॉ. अस्मिता जगताप (कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल,पुणे), स्वागत थोरात ( चित्रकार, वन्यजीव छायाचित्रकार, संपादक व दिग्दर्शक) डॉ. गणेश चंदनशिवे (लोककलावंत) आणि रूपा व दीपा परभणीकर (लावणी सम्राज्ञी) यांना यंदा उद्घाटन सोहळ्यात या सन्मानाने गौरविले जाणार आहे.

नेत्रदीपक उद्घाटन सोहळा – सनईच्या मंजुळ सुरांनी कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दीपप्रज्वलनाने या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर देवीची सामुहिक आरती होईल. या नंतर, पुण्याच्या नादरूप संस्थेच्या नृत्यांगना शमा भाटे व सहकारी ‘ओम कालिका’ सादर करतील. ‘आंबा आली ओ पाऊली’ हा देवीचा गोंधळ व जागर स्वाती धोकटे, विनोद धोकटे सादर करतील. तसेच ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त मानवंदना देणारा ‘शिवराज्याभिषेक’ हा कार्यक्रमही सादर करतील. सँडी डान्स अॅकॅडमीच्या कलावंतानी ‘बॉलीवुड धमाका’ सादर केल्यानंतर ‘पायलवृंद’ प्रस्तुत ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ हा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे सादर करतील. त्यामध्ये अभिनेत्री अमृता धोंगडे, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, सानिया चौधरी, अदिती द्रविड, ऋजुता सोमण, कार्तिकी आदमने, वैशाली जाधव, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर नृत्याविष्कार सादर करतील.
विधिवत घटस्थापना- शिवदर्शन येथील दाक्षिणात्य धाटणीच्या श्री. लक्ष्मीमाता मंदिरात रविवार दि १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ वा. सौ जयश्री व श्री. आबा बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होईल.

या उद्घाटन सोहळ्यात माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खा. वंदना चव्हाण, आ. माधुरी मिसाळ, आ. संग्राम थोपटे, आ. रवींद्र धंगेकर, माजी आ. मोहन जोशी, माजी आ. दीप्ती चवधरी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस अॅड अभय छाजेड, पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना पक्ष पुणे शहर प्रमुख संजय मोरे, विशाल चोरडिया (उद्योगपती), सुधीर वाघोलीकर (उद्योगपती), म. न. पा. पुणेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलीस, आयुक्त रितेश कुमार, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- भव्य उद्घाटन सोहळा, श्री. लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार, महर्षी पुरस्कार गानकोकिळा आशा भोसलेंच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वीट ९० आशा’, मराठी कवी संमेलन, आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्षानिमित्त ‘विनोदवीर अत्रे’ , अभिनेते देव आनंद जन्म शताब्दी वर्षानिमित्त “एक शाम देव आनंद के नाम’, श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘शिवराज्याभिषेक’ , महान नारी शक्तीला मानवंदना ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ , ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘ओ मेरे दिलके चैन’, तसेच विनोदी नाटक ‘यदा कदाचित रिटर्न्स’ व सलग १२ तास चालणारा लावणी महोत्सव असे भरगच्च कार्यक्रम दि. १५ ते दि. २४ ऑक्टोबर या काळात रोज सायंकाळी ७.०० वा. पुण्यातील श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे संपन्न होतील.

सांस्कृतिक कार्यक्रम सविस्तर माहिती – रविवार दि १५ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ७.०० वा. ‘ स्वीट ९० आशा’ हा मनोहारी कार्यक्रम सादर होईल. गानकोकिळा आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या अवीट गीतांचा नजराणा गीतांजली जेधे, अजय दुधवडे आणि गायक – वाद्यवृंद सादर करतील. अनुराधा भारती यांनी याचे संयोजन केले आहे.
सोमवार, दि .१६ रोजी सायंकाळी ७. ०० वा. कला रंजना निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार सादर होणार आहे. याची संकल्पना, दिग्दर्शन, निर्माते हे उदय साटम असून सहनिर्माती ज्योती उदय साटम आहेत.
मंगळवार, दि. १७ रोजी सायंकाळी ७. ०० वा. टीडीएम प्रस्तुत ‘रेट्रो से मेट्रो’ हा कार्यक्रम विवेक पांडे, गणेश मोरे, चारुलता आणि तेजस्विनी सादर करतील. याचे संगीत व सूत्रसंचालन मुकेश देढिया करतील.
बुधवार, दि. १८ रोजी सायंकाळी ७.०० वा. संवाद पुणे निर्मित ‘विनोदवीर अत्रे’ हा कार्यक्रम सादर होईल. विनोद सम्राट प्र.के. अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष प्रारंभानिमित्त हा विशेष कार्यक्रम सादर होईल. याची संकल्पना सुनील महाजन यांची आहे. संहिता लेखन, निवेदन रवींद्र खरे हे करतील. या कार्यक्रमासाठी संजय मेहेंदळे, मनीषा निश्चल हे गायक असतील. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे करतील.
गुरुवार, दि. १९ रोजी सायंकाळी ७.०० वा. ‘ओ मेरे दिल के चैन’ हा कार्यक्रम सादर होईल. ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदी गीतांचा सुरेल नजराणा प्रख्यात गायक जितेंद्र भूरूक, चारू पाटणकर, कल्याणी देशपांडे आणि वाद्यवृंद सादर करतील.
शुक्रवार, दि. २० रोजी सायंकाळी ७. ०० वा. सोहम प्रोडक्शन , भूमिका थिएटर्स प्रकाशित ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे मराठी विनोदी नाटक सादर होईल. सौ. मानसी केळकर व हास्य कलाकार यांनी याची निर्मिती केली आहे. लेखन व दिग्दर्शन संतोष पवार यांचे आहे.
शनिवार, दि. २१ रोजी सायंकाळी ७. ०० वा. ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम सादर होईल. जुनी हिंदी गाणी गझलचा सुरेल नजराणा प्रख्यात गायक रविराज नासेरी (मुंबई) सादर करतील.

रविवार, दि. २२ रोजी दुपारी १२ . ०० ते रात्री १२. ०० ‘लावणी महोत्सव’ सादर होईल. असा सलग १२ तासांचा लावणी महोत्सव महाराष्ट्रात पुणे नवरात्र महोत्सवाने सुरु केला आणि हे या महोत्सवाचे आकर्षणही ठरले. यामध्ये एकूण ६ लावणी ग्रुप असून १०० हून अधिक लावणी कलावंत यात सहभागी होत आहेत. यामध्ये ‘तुमच्यासाठी कायपन’ हा लावणी कार्यक्रम लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर, मृणाल लोणकर, ‘नटखट सुंदरा’ हा लावणी कार्यक्रम लावणी नृत्यांगना आरती पुणेकर, समृद्धी पुणेकर, ‘शिवानीचा नाद खुळा’ हा लावणी कार्यक्रम सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, काव्या मुंबईकर, ‘लावणी धमाका’ हा कार्यक्रम नृत्यांगना सोनाली जळगावकर, शितल पुणेकर, ‘अहो नाद खुळा’ हा लावणी कार्यक्रम प्रख्यात नृत्यांगना माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ हा लावणी कार्यक्रम नृत्यांगना नमिता पाटील, प्राची मुंबईकर सह कलावंतांसमवेत सादर करतील.
सोमवार, दि. २३ रोजी सायंकाळी ७. ०० वा. बहारदार ‘मराठी कवी संमेलन’ सादर होईल. प्रख्यात कवी रामदास फुटाणे याचे सूत्रसंचालन करतील. यात, अशोक नायगावकर (मुंबई), वैभव जोशी (पुणे), संजीविनी तळेगावकर (जालना), प्रशांत मोरे (कल्याण), तुकाराम धांडे(इगतपुरी), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगे), प्रशांत केंदळे (नाशिक) आणि अनिल दिक्षित (पुणे) हे सध्या गाजत असलेले कवी सहभागी होतील.
मंगळवार दि. २४ रोजी दसऱ्याच्या दिवशी २९ व्या ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’ची सांगता होईल. यादिवशी सायंकाळी ७. ०० वा. सूर पालवी प्रस्तुत ‘एक शाम देव आनंद के नाम’ हा कार्यक्रम सादर होईल. सिनेसुपरस्टार देव आनंद जन्मशताब्दी वर्षानिमित्त सादर होणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना संजय हिवराळे यांची आहे. पल्लवी पत्की – ढोले याच्या संयोजिका व गायिका आहेत. याबरोबर, रफी हबीब, संतोष गायकवाड, विनोद नरवडे व भव्य वाद्यवृंद देखील असणार आहे.
नवरात्रौच्या कालावधीत सलग १० दिवस आणि तब्बल २९ वर्षे चालू असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव हा सांकृतिक महोत्सव महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. या महोत्सवाअंतर्गत पुणे नवरात्रौ महिला महोत्सव ही गेली २४ वर्षे साजरा होत आहे.

‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’चे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम रसिक पुणेकरांसाठी विनामूल्य असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष, मा. उपमहापौर आबा बागुल यांनी केले आहे

घन:श्याम सावंत (सचिव), श्री. गणेश सह. बँक लि. पुणेचे चेअरमन नंदकुमार बानगुडे (कोषाध्यक्ष), नंदकुमार कोंढाळकर (सचिव), श्री. गणेश सह. बँक लि. पुणेचे संचालक रमेश भंडारी (सदस्य) सुनील महाजन (सांस्कृतिक प्रमुख) पदाधिकारी आहेत. घटस्थापना, पूजा अर्चा व धर्मिक विधीचे प्रमुख वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी, होतीलाल शर्मा गुरुजी हे आहेत.
आबा बागुल आयोजक अध्यक्ष पुणे नवरात्र महोत्सव ९८२२० १५४७९

Spread the love