Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

१९८३ चा वर्ल्डकप जिंकुन देणारे माजी क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडु आणि १९८३ क्रिकेट विश्र्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारे यशपाल शर्मा यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. ह्रदय विकाराच्या झटक्याने यशपाल यांची प्राणज्योत मावळली.

यशपाल हे भारतीय संघातील माजी मिडल ऑर्डर फलंदाज होते. याशिवाय ते १९८३ च्या विश्र्वचषक विजेत्या संघागे सदस्य देखील होते.

महत्वाची कामगिरी

यशपाल शर्मा कपिल देव यांंच्या नेतृत्वाखाली १९८३ च्या विश्र्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी ३७ एकदिवसीय आणि ४२ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

शर्मा हे १९७९-८३ दर्म्यान भरताच्या मध्यम फळीचा एक महत्वाचा फलंदाज होते. तसेच काही वर्षे त्यांनी निवडक्र्ता म्हणुनही कामे केले.

आणि २००८ मध्ये पुन्हा पॅनेलवर त्यांची निवड करण्यात आली होती. यावेळी ते ६६ वर्षांचे होते.

यशपाल शर्मा हे भरतीय संघाकडुन सर्वाधिक धावा करणारे दुसरे फलंदाज होते. त्यांनी ३७ कसोटी सामन्यात ३३.४५ च्या सरासरीने १६०६ तर ४२ एकदवसीय सामन्यात २८.४८ च्या सरसरीने ८८३ धावा केल्या आहेत.

कपिल देव झाले भावुक

 यशपाल यांच्या निधनानंतर संपुर्ण क्रिकेट विश्र्वाला मोठा धक्का बसला आहे. कपिल देव यांना देखिल आपल्या सहकार्याच्या मृत्युची बातमी ऐकुन गहिवरुन आले. एका टिव्ही चॅनल ला दिलेल्या प्रतिक्रिये दरम्यान कपिल देव यांना रडु कोसळेले.

सोशल मिडियावर यशपाल यांना त्यांच्या क्रिकेट च्या चाहत्यंनी दुःख व्यक्त केले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342 / 8087990343

Follow Our Other Social Media Platforms for more about blogs like this.

website : https://chatrapatinewsindia.com/
Facebook : https://www.facebook.com/ShivajiMHulawale
Instagram : https://www.instagram.com/chatrapatinewsindia
Twitter : https://twitter.com/ChatrapatiMedia
Pinterest : https://in.pinterest.com/chatrapatinewsindia/news-update/

Spread the love