Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

२०२२ मध्ये मनसे ठरवणार पुण्याचा महापौर – वसंत मोरे

मंडई विद्यापीठ कट्टा, पुणे तर्फे मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा सत्कार

पुणे, १७ जुलै २०२१: सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुणे शहरात विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारी ही कट्टासंस्कृती आहे. मंडई विद्यापीठ कट्टा हा त्यातील एक महत्त्वाचा कट्टा शहरला माहिती आहे.

आज कट्टावर पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. शहराच्या विविध प्रश्नावर, राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात या मुद्यावर विषेश लक्ष केंद्रित करून आज कट्टावर चर्चा झाली.

यावेळी कोरोना काळात देवदूत म्हणून शहरात काम केल्यामुळे मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या तर्फे मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा विषेश सत्कार देखील करण्यात आला.

सोबतच आजच्या कट्टावर गणेश सातपुते (मनसे, प्रदेश उपाध्यक्ष) रुपाली ठोमरे पाटील (मनसे, महिला शहराध्यक्षा), रणजित शिरोळे (मनसे, प्रदेश उपाध्यक्ष), गणेश भोकरे (कसबा अध्यक्ष), मनिषा कावेडीया व हर्षद मालुसरे आदी उपस्थित होते.

वसंत मोरे म्हणले, पुण्यात दोनच्या प्रभाग रचनेत मनसेची चांगली ताकद आहे. मागील काही काळात पक्षाने जे शहरातील प्रमुख भागात परिक्षण केल त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उत्तम प्रतिसाद आहे.

नगरसेवकांनी काम कसे करावे याचा अभ्यास करायचा असेल तर एकदा माझ्या कात्रजची पाहणी करावी हा माझा लोकप्रतिनिधींना असेल.

तसेच येत्या निवडणुकीत मनसे कडून हा कात्रज पॅटर्न राबवला जाईल आणि पुणे महानगरपालिकेत महापौर कोण असणार हेही मनसेच ठरवेल.

बाळासाहेब मालुसरे म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात, विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे समविचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते.

त्याच क्रमांत राजकारणाच्या दृष्टीने पुणे शहर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज शहरातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते.

येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे कशी भुमिका घेऊन काम करेल यावर आज चर्चा झाली.

येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित करणार आहोत.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी️
संपर्क: *शिवाजी मा. हुलवळे*
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love