Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघ तसेच कला क्रीडा व कल्याण संघटना जिल्हा पुणे यांचे वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले.

आज दिनांक 22 जुलै 2021 रोजी मंगळवार पेठ वेअर हाऊस पुणे येथे राज्य उत्पादन शुल्क सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघ तसेच कला क्रीडा व कल्याण संघटना जिल्हा पुणे यांचे वतीने

ना अजित दादा पवार उपमुख्यमंत्री अर्थ नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांचे 62 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

रक्तदान शिबिराची सुरुवात विभागाचे विभागीय उपायुक्त श्री प्रसाद सुर्वे व पुणे जिल्ह्याचे अधीक्षक तसेच कला क्रीडा व कल्याण संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष झगडे यांनी केली.

सेवानिवृत्त संघाचे तसेच कला क्रीडा व कल्याण संघटनेचे प्रतिनिधी श्री एस के सुपाते श्री जयवंतराव निंबाळकर श्री कानेटकर एन के बोराडे श्री के एस पवार व श्री प्रकाश रेणुसे उपस्थित होते.

रक्तदात्यांना सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष श्री केसी शेलार यांनी प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले सदरचे शिबिर यशस्वी करण्यात कला क्रीडा व कल्याण संघटनेचे सहसचिव श्री तानाजी शिंदे यांचा मोलाचा वाटा होता.

सदरचे शिबिर केईएम ससून तसेच आधार या रक्त पेढ्यांच्या सहकार्याने पार पडले शिबिरात एकूण 75 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

**************************
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love