Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महाराष्ट्रतील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स चा उपक्रम

मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स चा उपक्रम: यावर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेषतः महाड-चिपळूण-सांगली-कोल्हापूर परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्‌वस्त झाली.

या आपत्तीमुळे अस्वस्थ झालेल्या अनेकांनी तेथे मदतकार्यासाठी धाव घेतली.

आपत्तीग्रस्त भागात नेहमीच मदतकार्य पोहोचवीणारे मुकुल माधव फॉउंडेशन आणि टीम यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दोन ट्रकसह एक स्वयंसेवकांची टीम तातडीने महाड मधील पूरग्रस्त भागात पाठवली.

या टीम ने सोबत जीवनावश्यक वस्तूंसमवेत, किराणा, चादरी आणि कपडे देखील पाठवले.

मुकुल माधव फाउंडेशन ने काही ट्रक साधनसामग्री घेऊन पूरग्रस्त चिपळूण, पाटण तालुक्यातील काही गावे आणि महाड परिसरातील राजेवाडी, कोंडीवली, अकले, टेमघर, बिरवाडी, काळीज, आदिवासी वाडी, खरवली, बुद्धवस्ती अशा अनेक गावात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे, कपड्यांचे आणि किराण्याचे वाटप केले.

चिपळूण आणि पाटण तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या काही गावात देखील टीम मदत घेऊन पोहोचली. यावेळी ग्रामस्थांच्या मदत घेते वेळी ग्रामस्थांचे अश्रू अनावर झाले.

स्थानिक प्रशासनाच्याच्या ही आधी आपली मदत आमच्या कडे पोहचली आम्ही जन्मभर ऋणी राहू असे आभार मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स चे ग्रामस्थांनी मांडले.

यावेळी मदतकार्यात खासदार संभाजीराजे छत्रपती तसेच मुकुल माधव फाउंडेशन चे राज देशमुख, दिलीप शेलवंटे, सचिन कदम, डॉ. ऋतुराज कदम आणि अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love