Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना पुणे शहर काँग्रेसतर्फे मिळाली मदत – आबा बागुल

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे पंधरा गावातील पूरग्रस्तांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने तेथे जाऊन थेट मदत वाटप करण्यात आली.

पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले यांच्या हस्ते ही मदत रवाना झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ,शाहूपुरी, कनवड,दानवड, आलास, बुबनाळ,हसुर आणि सांगली जिल्ह्यातील भरतवाडी,कनेगाव, इस्लामपूर,तुजारपूर, गौनवाडी येथील सुमारे दोन हजार व अधिक कुटुंबांना धान्याचे किट व अन्य साहित्य देण्यात आले.

सुमारे तीन ट्रक भरून हे साहित्य चाळीस कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचल्यावर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कुटुंबांना धान्याचे कीट,ब्लॅंकेट,साडी,पिण्याचे पाणी व व औषधे वाटप करण्यात आले. तेव्हा त्यावेळी गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले.

तीन दिवसाच्या या मदत वाटप कार्यक्रमात प्रथम सांगली जिल्ह्यातील भरतवाडी,कनेगाव, इस्लामपूर,तुजारपूर, गौनवाडी गावांमध्ये हे साहित्य पोहोच करताना कोणत्या भागात अधिक गरज आहे त्याची माहिती गोळा करून केली होती.

त्याआधारे चाळीस कार्यकर्ते व स्वतः आबा बागुल यांच्या पुढाकाराने ही मदत सर्वांना देण्यात आली,.

यावेळी गावकऱ्यांनी धन्यवाद दिले आभार मानले व थेट मदत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था केली साखर कारखान्याच्या केली होती.

कार्यकर्त्यांनी सर्व साहित्य सोबत नेल्याने स्वतःचा स्वयंपाक स्वतःच केला ही विशेष बाब होती.

सांगली येथे गावकऱ्यांशी बोलताना आबा बागुल यांनी सांगितले की दोन वर्षापूर्वी कोल्हापूर सांगली भागात पूर आला असताना आम्ही अशीच मदत घेऊन आलो होतो.

त्याची आठवण अनेक गावकऱ्यांनी काढली त्याचा उल्लेख करून बागूल म्हणाले की, पूर आला किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली, तर आम्ही मदतीला धावून येणारच.

मात्र पुरासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता विविध टाऊन प्लॅनर यांना एकत्र करून कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भाग येथील नद्यांचा प्रवाहांना पावसाळ्यामध्ये कॅनॉलचे ड्रायव्हरशन देऊन पुराचे पाणी शहरात जाणार नाही यासाठी काही नियोजन करता येते का? त्याचा आम्ही अभ्यास गट निर्माण करत आहोत.

त्याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळातही असा नदीला पूर आला तरी या कॅनॉलमधून बाहेरुनच पाणी निघून जाईल त्यांच्याकडे या कल्पनेला गावकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडात समाधान व्यक्त केले.

या मदत मदत वाटपामध्ये रेशन किटमध्ये साखर,चहा पावडर, तांदूळ,डाळ,मीठ,तेल,साबण,मेणबत्ती, हळद,मसाले इत्यादी जीवनावश्यक वस्तू होत्या व ब्लॅंकेट,साड्या,सोलापुरी भाकरी-चटणी, पिण्याचे पाणी असे मदत साहित्य होते.

सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचा भाग म्हणून या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांना अनेक गावांमध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना अशावेळी सोबत आणलेली घमेली फावडी सफाईच्या साहित्याच्या आधारे अनेक गावांमध्ये साफसफाई कित्येक तास करून गावकऱ्यांना आधार देण्यात आला.

कार्यकर्ते सर्व कचरा गाळ काढत असताना गावकऱ्यांनी देखील मदतीचा हात लावला. या साफसफाई मुळे गावात झालेली दुर्गंधी अनेक ठिकाणी कमी व्हायला नक्कीच मदत झाली.प्रत्यक्ष मदत वाटण्याकरिता आबा बागुल यांच्यासह अमित बागुल, हेमंत बागूल, अभिषेक बागुल, महेश ढवळे, सागर आरोळे,संतोष पावर,इम्तियाज तांबोळी,समीर शिंदे, राम रणपिसे,धनंजय कांबळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love