Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश – पृथ्वीराज चव्हाण

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर मंत्र्यांना काम करू देत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री 
अकार्यक्षम होते तर मग त्यांना सात वर्षे पदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का ठेवले?

कोरोना काळातील अपयशाची जबाबदारी स्वतः मोदीनि घेतली पाहिजे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून काहीही होणार नाही.

तर पंतप्रधान मोदीनाच बदलण्याची गरज असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील आयोजित   पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अभय छाजेड उपस्थित होते.

महागाई वरून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना महामारी मुळे उद्योग धंदे बंद होऊन कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले आहेत अनेकांना आजारपणामुळे कर्ज काढावे लागले आहेत असे असताना खाण्यापिण्याच्या मूलभूत गोष्टी एवढ्या महाग झाले आहेत की सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे अर्थव्यवस्थेत एवढं सगळं आलबेल असेल तर सामान्य लोकांवर पेट्रोल-डिझेलच्या कराचा बोजा का टाकला जात आहे?

जीएसटी आल्यापासून केंद्राचा राज्यांच्या कराचा वाटा वेळेवर देत नाही जीएसटीचा वाटा वेळ वर मिळत नसल्याने देशभरातील सर्वच राज्य सरकारांना पेट्रोल डिझेल वरील वेट आणि दारू विक्रीतून मिळणारे उत्पादन शुल्क यावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे राज्य सरकारकडे स्वतःचा
असा उत्पन्न स्रोत म्हणून पेट्रोल डिझेल वरील कर आवश्यक आहे या उलट केंद्र सरकारला उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत प्रत्यक्ष कर, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी ,एक्साईज ड्युटी, कंपन्या विकणे यापैकी कोणत्याही स्त्रोत राज्य सरकारकडे नसल्याने त्यांना पेट्रोल डिझेलवर किमान कर लावणे ही अपरिहायता आहे.

इंधन दरवाढीवरून टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मागील वर्षी कोरोना महामारीचे असताना देखील पेट्रोल डिझेल च्या भावात मोठ्या प्रमाणात भाव वाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटले आहे एकाच वर्षात पेट्रोल 23% डिझेल 28% गॅस 41 टक्के इतकी भाव वाढ झालेली आहे देशातील 250 हुन अधिक शहरांमध्ये
पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे तेलाचे भाव 70 ते $75 डॉलर प्रति बॅरेल असताना केवळ केंद्र सरकारने वाढविल्या करामुळे सामान्य जनतेवर हलाखीची परिस्थिती झाली आहे.

2014 खाली पेट्रोल वर एक्साईज ड्युटी 9.48 रु इतकी होती तर आता मोदी सरकारने 32 .90 रुपये प्रति लिटर नक्की केली आहे म्हणजे जवळपास 316 टक्क्यांनी वाढ केलेली आहे त्याचप्रमाणे 2014 मध्ये डिझेलवर 3.80 रुपये एक्साईज ड्युटी होती व ती आता वाढवून 32 रुपये केली आहे म्हणजेच आठशे टक्के वाढ मोदी सरकारने या वाढविलेल्या करामुळे प्रति वर्षी सरासरी 4 .25 लाख कोटी कर जमा केला आहे.

पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे रसातळाला गेली आहे .

चुकीच्या गोष्टीं कडून दुसरी कडे लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्व काश्मीर प्रश्न लव जिहाद कायदा या गोष्टी पुढे करून लोकांची दिशाभूल केली जात आहे.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात 14 टक्के लोकांना दरिद्रय रेषेतून बाहेर काढले होते मात्र मोदी सरकारच्या काळात 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालील ढकलले गेले सिएमआई च्या अहवालानुसार 12.5 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत देशात सद्यस्थितीत किमान दोनशे कोटी दिवस आवश्यक आहेत. आणि त्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे .

सर्व लस एकाच वेळी खरेदी करण्याची गरज होती. पण तसे झाले नाही 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करायचे झाले तर आणखी पंचवीस ते तीस कोटी डोस लागतील.
असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love